Ad will apear here
Next
व्यक्तिस्वातंत्र्य हा मूलभूत हक्क : डॉ. रझिया पटेल
बारामती (पुणे) : 'स्त्री आणि पुरुष ही मानवी व्यक्तिमत्वाचे दोन अविभाज्य भाग आहेत. ते दोन्ही समसमान आहेत याची जाणीव आजच्या युगातल्या युवकांना असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य हा त्याचा मूलभूत हक्क आहे,' असे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल यांनी व्यक्त केले. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामधील ‘लिंगभाव आणि विकास पदवीपूर्व आंतरशाखीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमा'च्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

डॉ. पटेल पुढे म्हणाल्या, ‘अनेक वर्षांपासून स्त्रियांचे समाजातील स्थान दुय्यम असल्याचे दिसून येते. धर्म, प्रथा, परंपरा, कौटुंबिक वातावरण या सर्वांमध्ये याची पुनरावृत्ती पहायला मिळते. मानव समाजाचा इतिहास पाहता, या समाजाचा रचनात्मक पाया प्रथम स्त्रीने उभा केला, परंतु आज मात्र तिला तो सन्मान मिळत नाही. तिला मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीचे मोठे आव्हान येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना पेलायचे आहे. स्त्री समानतेच्या लढ्यात जबाबदारी घेऊन, पुरुषांचाही तितकाच सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण स्त्रीला दुय्यम वागणूक देणारी बलाढ्य पुरुषसत्ताक संस्कृती हे या समस्येचे मूळ कारण आहे. स्त्री समानता म्हणजे स्त्रियांचा पुरुषांविरुद्धचा लढा नसून, तो दोघांचा केवळ समानतेचा लढा आहे. म्हणूनच या लढ्यात पुरुषांची साथ गरजेची आहे.’ 

‘माणसाने माणसाशी माणूस म्हणून वागण्याची संस्कृती विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासोबत  जोपासणे हे महाविद्यालयाचे प्रथम उद्दिष्ट आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, व्यक्तीस्वातंत्र्याचे महत्त्व जाणून त्याचा आदर विद्यार्थ्यांकडून केला जाईल. स्त्री पुरुष समानतेचे हे मूल्य महाविद्यालयाचा प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी समाजात पुढे रुजवेल,’ असा विश्वास प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.

कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. विनायक लष्कर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्त्री अभ्यासकेंद्राचे समन्वयक प्रा. ललित भवरे यांनी अभ्यासकेंद्र सुरू करण्यामागील भूमिका व त्याचे एकूण स्वरूप आपल्या मनोगतात स्पष्ट केले.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम काकडे आणि कोमल महांगडे या विद्यार्थ्यांनी केले तर, आभार डॉ. प्रतिभा जावळे यांनी मानले. कार्यक्रमाला माजी उपप्राचार्य डॉ. रंजना नेमाडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. वैशाली माळी, महाविद्यालयाचे स्त्री आणि विकास अभ्यासक्रम समिती सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZYUBG
Similar Posts
‘शिक्षणातील बदलते प्रवाह जाणून घेणे गरजेचे’ बारामती : ‘पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची या शैक्षणिक युगात निकड भासत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पिढीतील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण देणे हे आजच्या शिक्षकाचे कर्तव्य आहे. हा बदल करण्यासाठी प्राध्यापकांनी शिक्षण क्षेत्रात बदलत असलेले प्रवाह जाणून घेणे गरजेचे आहे,’ असे मत पुणे विभागाचे उच्च शिक्षण सह संचालक डॉ
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात महिला आरोग्यविषयक कार्यशाळा बारामती : विद्यापीठ अनुदान आयोग, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय आणि निरामय मेडीकल व रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्यविषयक जाणीवजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात सोलापूर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ.रोहिणी देशपांडे यांनी ‘वयात येताना’ या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधला
राष्ट्रीय आयोगाच्या तज्ञ समिती सदस्यपदी प्रा. विनायक लष्कर बारामती (पुणे) : प्रा. विनायक सुभाष लष्कर यांची राष्ट्रीय विमुक्त, भटक्या आणि निम्नभटक्या जाती-जमाती आयोगाच्या तज्ज्ञ समिती सदस्यपदी (कार्यगट) नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगात एकूण आठ कार्यगट असून, प्रा.लष्कर हे त्यापैकी तीन गटांचे सक्रिय सदस्य आहेत. या कार्यगटांमध्ये भटक्या-विमुक्त जमातीमधील स्त्रियांचे
बारामती येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात पुणे : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त बारामती येथे तालुका प्रशासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच म. ए. सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने योगदिनाचा कार्यक्रम म. ए. सोसायटीच्या मैदानावर घेण्यात आला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language